Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील सुसगावला कामगारांच्या झोपड्यांना आगः तीन सिलेंडरचा स्फोट तर 28 सिलेंडर...

पुण्यातील सुसगावला कामगारांच्या झोपड्यांना आगः तीन सिलेंडरचा स्फोट तर 28 सिलेंडर जळाल्याची घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील सुसगाव येथे शेल पेट्रोल पंपाजवळ बेलाकासा इमारत येथे असलेल्या कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार माहिती मिळताच, पुणे अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरुड, वारजे येथील अग्निशमन वाहने तसेच एक वॉटर टँकर आणि पीएमआरडीए दोन अग्निशमन वाहन व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन वाहन अशी एकुण 9 वाहने रवाना करण्यात आली होती. या आगीत तीन सिलेंडरचा स्फोट तर 28 सिलेंडर जळाल्याची घटना घडली आहे.

अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग असल्याचे जवानांनी पाहिले. त्यांनी तातडीने प्रथमतः आतमध्ये कोणी अडकले आहे का हे पाहत आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. आग इतरञ इतर झोपड्यांमध्ये पसरु नये, याची विशेष खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पुढील धोका दूर केला. सदर आगीमध्ये तीन घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळी घरगुती वापराचे छोटे मोठे असे एकूण 28 सिलेंडर जळाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणीही जखमी वा जिवितहनी झालेली नाही. येथे कामगारांच्या एकूण 50 झोपड्या असून 20 झोपड्या जळाल्या, तर इतर 30 झोपड्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी हानी होऊन दिली नाही. कामगारांच्या झोपड्यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पुर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

याबाबत पुणे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरज पसरु न देता मोठा धोका टाळला. सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याने जर त्यांचा ही स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments