इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या घटनेने पुणे शहर हादरलं असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकारावर आता पोलिसांचीं पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, बस स्थानकावर आजूबाजूला लोकांची वर्दळ होती त्यावेळी ही घटना घडली. मुलीने त्यावेळी आरडाओरडा केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा तापला असताना आता गुन्हेगारी विश्वातून आणखीन प्रकरण समोर आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. स्वारगेट बसताना वर नक्की काय घडलं याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. यामध्ये घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्येही दिसून आले कि, 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती त्यावेळी आरोपी तरुणीला बस स्टॅन्ड वर भेटला. तिला फलटणची बस शोधण्यास मदत करतो असं सांगून दुसऱ्या एका एसटी बस मध्ये तिला बसवलं. दुसऱ्या बस मध्ये असलेला अंधार पाहून तरुणी घाबरली. त्यावर रात्रीची लेटची बस असल्याने लोक झोपले आहेत म्हणून दिवे बंद असल्याचं आरोपीने सांगितलं. यानंतर तो तिला बसच्या वरच्या बाजूला टॉर्च लावून बघण्यास सांगितल्यानंतर त्या क्षणी दरवाजा लावून घेतो. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला. यानंतर आरोपी बसमधून खाली उतरल्यानंतर दोन मिनिटांनी मुलगीही खाली उतरली. तिने आरडाओरडा न करता तिथून निघून गेली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या मित्राला सांगितला त्यानंतर मित्राने याबाबत तक्रार करायला लावली. घडलेल्या या प्रकारामुळे तिला धक्का बसला असावा, त्यामुळे त्यावेळी काय करावं हे तिला सुचलं नसावं. त्यामुळे ती उशिरा आली. पण तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवली. अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी कॅमेरात कैद झाला आहे. दत्तात्रय रामदास गाडे त्याच नाव असून तो शिरूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ३९२ सारखे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकावर गजबजलेल्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाल्याने पुणे शहर हादरलं आहे.