Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील शंकर महाराज मठात भाजपाच्या दोन गटात राडा; मठाच्या आवारात हाणामारी झाल्याने...

पुण्यातील शंकर महाराज मठात भाजपाच्या दोन गटात राडा; मठाच्या आवारात हाणामारी झाल्याने टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : येथील मोहोळ-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठामध्ये भाजपाच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. नवनियुक्त केंद्रीय सहकार आणि नागरिक विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच भाजपाचे दोन गट एकमेकांना भिडले.

माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि महेश वाबळे हे शंकर महाराज मठात दर्शनासाठी आले असता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी सुरवातीला त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर, शिवीगाळ करत नंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे तेथील उपस्थित नागरिकांनी सांगितले.

या घटनेमुळे याठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा सर्व प्रकार मुरलीधर मोहोळ यांच्या समोरच घडला.

यावेळी भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असा कोणताही वाद झाला नसल्याचे सांगितले. परंतु, तेथील उपस्थित नागरिकांनी हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे भाजपाची मोठी कोंडी झाली आहे. पक्षश्रेष्ठी याची दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments