इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वडगाव शेरीतील भाजपचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे हे घरवापसी करणार आहेत. बापूसाहेब पठारे यांनी गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले बापूसाहेब पठारे?
बापू पठारे म्हणले कि, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून आगामी विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. बापू पठारे यांच्या घोषणेने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण पुणे क्षाराचे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा लढविण्यास बापू पठारे इच्छुक
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास बापू पठारे इच्छुक आहेत. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे तेथे विद्यमान आमदार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लढविणार आहे. ज्याचा जिथे विद्यमान आमदार, त्याला तिथे तिकीट असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे भाजपमध्ये राहिलो तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित होताच बापू पठारे यांनी बाजू पलटली आहे.