Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील वडगांवमध्ये बांधकाम मजुराचा खूनः बिहारमध्ये पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ठोकल्या...

पुण्यातील वडगांवमध्ये बांधकाम मजुराचा खूनः बिहारमध्ये पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडगाव येथील बांधकामाच्या साइटवर बांधकाम कामगारचा मृतदेह आढळून आला. चौकशीअंती व वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा खून झाल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा आरोपींना कुर्ला रेल्वेस्थानकातून बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. पिंटु दास (26, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक बांधकामाची साईट सुरू आहे. तेथे पिंटु दास आणि आरोपी काम करत होते. तर दास याला दारूचे व्यसन होते. ते याच बांधकाम साईटच्या पाचव्या मजल्यावर दास आणि आरोपी दारू पिण्यास बसले होते.

यावेळी त्याच्यात झालेल्या बाचाबाचीतून आरोपींनी त्याच्या डोक्यात जड कसल्यातरी वस्तूने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दास याचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान त्याला तेथेच टाकून ते रेल्वेने बिहारकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. दरम्यान त्यांनी खून करण्या मागचे नेमके कारण काय होते ? याचा पोलिस शोध घेत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याचा छडा लावला.

किरकोळ वादातून एकमेकांना मारहाण

किरकोळ कारणावरून एकमेकाला हाताने मारहाण करत दोन वाहनांवर दगडफेक करण्याची घटना औंध येथील डी मार्ट समोर घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गटातील सहा जणांवर चतुः श्रृंगी पोलिस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना औघ येथील वेस्टर्न रिव्हर बिल्डिंग डी मार्ट समोर घडली. याबाबत सिद्धेश सर्जेराव पढेर (वय 25, रा. वेस्टन रिव्हर बिल्डिंग, औंध) यांने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश तानाजी पवार (वय 30) मंगल तानाजी पवार (रा. दोघेही चांदे-नांदे, ता. भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेश तानाजी पवार (वय -30, सध्या रा. वेस्टर्न रिव्हर बिल्डिंग, औंध, मूळ रा. चांदे-नांदे, ता. भोर) याने दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश पढेर, मल्हारी पढेर, सोमनाथ पढेर, केतन पढेर, सुनीता सर्जेराव पढेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments