Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील येरवडा कारागृहात तीन गुंडांचा एकावर हल्ला

पुण्यातील येरवडा कारागृहात तीन गुंडांचा एकावर हल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी फिर्याद दिली आहे. श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरीश भोसले, आकाश मंगेश सासवडे ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. येरवडा कारागृहातील सीजे विभागातील बॅरेक क्रमांक एकच्या परिसरात १४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मारहाणीची घटना घडली.

कैदी योगेश जगदीश सोनवणे बराकीत बसला होता. त्या वेळी आरोपी काळे, भोसले, सासवडे यांनी सोनवणेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. बराकीत हाणामारी झाल्याची घटना घडल्यानंतर बंदोबस्तावरील रक्षकांनी काळे, भोसले, सासवडे यांना ताब्यात घेतले. आकाश सासवडे हा नाना पेठेतील सराईत गुंड असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments