इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनाधिकृत प्लॉटिंगवर कठोरात कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका, पीएमआरडीए आणि महसूल विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली असून याआधी येवलेवाडी भागात अनाधिकृत प्लॉटिंग करण्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देखील मंत्री बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे. सदस्य योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कंत्राटदाराने भ्रष्ट मार्गाने अनाधिकृत प्लॉटिंग करून लोकांची फसवणूक केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्त यांची समन्वय साधून पुढील कायदेशीर कारवाईची पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.