Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील बोगस मेडिकल कॉलेजला टाळं; 12 लाख फी भरलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

पुण्यातील बोगस मेडिकल कॉलेजला टाळं; 12 लाख फी भरलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस मेडिकल कॉलेज सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. राज्य शासनाच्या आयुष विभागानं या बोगस मेडिकल कॉलेजवर कारवाई करून कॉलेज सील केलं आहे. तसेच संचालकावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरॅकल इन्स्टिट्यूट असं या बोगस मेडिकल कॉलेजचं नाव आहे.

नॅचरोपॅथीच्या नावाखाली सुनील चव्हाण नावाच्या व्यक्तीनं ओरॅकल इन्स्टिट्यूट हे बोगस मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं. याठिकाणी संस्था चालकांनी लाखो रुपये फी उकळून विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओरॅकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट तथा हिम्स मेडिकल अकॅडमी ही खानापूर येथील खानापूर-पानशेत रस्त्यावरील मनेरवाडी (ता. हवेली) येथे गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे. त्याआधी ती नांदेड सिटी, सिंहगड पायथा येथे वेगवेगळ्या नावांनी सुरू होती. तसेच दर सहा महिन्याला या इन्स्टिट्यूटच्या नावात बदल करून त्यांना इतर राज्यांतील विद्यापीठाची मान्यता असल्याचे सांगून त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस सुरू केले होते.

त्यामध्ये प्रामुख्याने बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (बीएनवायएस), बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तसेच पीजी कोर्सेस जसे एमडी न्युट्रिशन अँड डायटिशियन, क्लिनिकल नॅचरोपॅथी, यासारखे कोर्सेस चालवले जायचे. जेव्हा विद्यार्थ्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तालयाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर वैद्यकीय विभागाने पुण्यातील आयुष संचालनालयाच्या सहायक संचालक वैद्य अनिता कोल्हे आणि मुंबईतील आर. ए. पोतदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख मनोज गायकवाड यांनी या ओरॅकल इन्स्टिट्यूटची चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात संस्थेची चौकशी केली असता संस्थाचालक सुनील चव्हाण यांच्याकड कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यानंतर या इन्स्टिट्यूटवर कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments