Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील बिबवेवाडीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खूनः आरोपी स्वतः बिबडेवाडी पोलिस ठाण्यात...

पुण्यातील बिबवेवाडीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खूनः आरोपी स्वतः बिबडेवाडी पोलिस ठाण्यात झाला हजर; गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बिबवेवाडीतील एका बांधकाम सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील एका गाळ्यात तरुणाचा डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपी स्वतःहून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती नारिकांनी दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी नागरिकांनी गर्दी केली होती.

बसवराज चिदानंद गजेंत्रे (वय 26, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कवट्या उर्फ आतिश शिरसाठ (25, रा. आंबेडकरनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, अप्पर डेपो इंदिरानगर परिसरात बाळासाहेब ओसवाल यांच्या कॉम्प्लेक्सच्या (मार्केट) इमारतीचे बांधकाम काम सुरू आहे. त्याठिकाणी गाळे काढण्यात आलेले आहेत. दरम्यान, एका गाळ्यात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही माहिती मिळताच बाळासाहेब ओसवाल यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना याची माहिती कळविली.

त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी येथे धाव घेतली. त्यावेळी डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, खून झालेला बसवराज हा कचरा वेचण्याच्या गाडीवर काम करत होता. तर अटक केलेला संशयीत आरोपी कॉम्प्लेक्समध्येच सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले.

आरोपी रविवारी रात्री बसवराजला घेऊन घराबाहेर गेला होता. मात्र रात्री तो घरी आलाच नाही. सोमवारी सकाळी पोलिस बसवराजच्या घरी आल्यावर त्यांना बसवराजचा खून झाल्याची माहिती कळाली. तसेच खून करून एक अरोपी पोलिस ठाण्यात हजर झाल्याचेही समजले.

यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनी आरोपीचे इतर साथीदार असण्याचाही संशय त्यांनी व्यक्त करताना त्यांनाही अटक करण्याची मागणी केली. यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments