इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे ; पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्ता वेताळ टेकडीवरून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने बालभारती पौंडफाटा रस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने आता रस्ता तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
नागरिक चेतना मंचाने मुंबई उच्च न्यायालयात बालभारती ते पौड फाटा रस्ता होऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. त्यामुळे रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळाली त्यानंतर तीन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवून फेटाळून लावल्याने रस्त्याच्या कामाचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेने वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता या तीन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड फाटा यादरम्यान वेताळ टेकडीवरून मार्गाचे नियोजन केले या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला, त्यांच्याकडून या परिसराचा अभ्यास करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला. महापालिकेने या कामाचा प्रकल्प आराखडा तयार केला असून, त्यासाठी २५२ कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार आहे.
परंतु या मोठी वनसंपत्ती असल्याने तेथील झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. या कारणांमुळे पर्यावरणप्रेमींकडून आणि स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे