Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग, परिसरात धुराचे लोट;

पुण्यातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये आग, परिसरात धुराचे लोट;

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील (Pune) विमाननगर (Viman Nagar) परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या (Phoenix Market city Mall) वरच्या मजल्यावर आज (१९ एप्रिल २०२४) दुपारी आग लागली. या घनटेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, दोन वॉटर टँक आणि एक ब्रॉन्टो घटनास्थळी रवाना झाल्या. फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, जे कोरोना महामारीच्या काळापासून बंद होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० ते ५० जवानांनी कर्तव्य बजावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments