Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील पर्वती भागात दंगल प्रकरणी: 160 ते 180 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून...

पुण्यातील पर्वती भागात दंगल प्रकरणी: 160 ते 180 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून 12 जणांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील पर्वती परिसरात नुरानी मस्जिद परिसरात पताका लावण्यावरुन झालेल्या लहान मुलांच्या भांडणानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात भांडण झाल्याच्या अफवेवरुन दोन गट एकमेका समोर येऊन बेकायदेशीररित्या जमाव जमवून एकमेकांच्या दिशेने दगडफेक करत दंगलीचा प्रकार घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या १६० ते १८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात अाला असून पोलीसांनी १२ जणंना अटक केली अाहे.

गौरव भामरे, अभिजीत काळे, अोम कोलते, अादेश काळे, प्रेम क्षिरसागर, विनय पालखे याचा मोठा भाऊ, अावेज कुरेशी, अफजल अन्सारी, अबुजर कुरेशी व इतर १६० ते १८० हिंदु मुस्लीम समाजाचे व्यक्तींवर याबाबत भांदवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३३६,४२७, म.पो.अधि.३७ (१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत पोलीस शिपाई संजय अात्माराम भरगुडे यांनी अारोपी विरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली अाहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती भागात नूराणी मस्जिद जवळ व भामरे चौकाकडून नुराणी मस्जिदकडेयेणाऱ्या रस्त्यावर सदरचा प्रकार एक एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते सकाळी सव्वासात वाजेपर्यंत घडलेला अाहे. ३१ मार्च रोजी रात्री पर्वती भागात नूरानी मस्जिद जवळील परिसरात ईदच्या पताका लावण्यावरुन मुलांमध्ये वाद निर्माण झाला होता.

याबाबत पोलीस ठाण्यात एनसी देखील दाखल झाली. पोलीसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रित ठेवली. परंतु रात्री साडेबारा वाजता दोन्ही बाजूचे गट एकमेका समोर अाले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सदर ठिकाणी अारडाओरड करुन घोषणाबाजी केली. यावेळी जमावातील काही लोकांनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक केल्याने त्यात रस्त्याचे कडेला पार्क केलेल्या काही वाहनांचे फोडून नुकसान करण्यात अाले. तसेच सदर परिसरातील नागरिकांचे जीवीतास धोका निर्माण करुन पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी काढलेल्या जमावबंदीचे अादेशाचे उल्लंघन करुन पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती परवानगी शिवाय एकत्रित जमून तसेच दगड, गोठे अशी कोणतीही वस्तू वापरण्यास मनाई आदेश असताना देखील त्या अादेशाचे उल्लंघन करताना मिळून अाले अाहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस कांबळे करत अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments