इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील नगर-कल्याण महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना ओतुरजवळ आज रविवारी दुपारच्या सुमारास घडला.
पुण्यातील ओतुरजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे.