Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील दोघांसह आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना दिल्लीत शिक्षाः देशातील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोटाचा...

पुण्यातील दोघांसह आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना दिल्लीत शिक्षाः देशातील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोटाचा कट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करणारे, देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. यात पुण्यातील एका तरुणीसह दोघांचा समावेश आहे.

जहानजेब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे), नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दूर बसित अशी आरोपींची नावे आहेत. मार्च २०२० मध्ये दिल्ली पोलिसांनी जहानजेब वाणी व त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपी देशातील महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री हे त्यात सहभागी असल्याचे उघडकीस आले होते. या दोघांना एनआयएच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती. नंतर बंगळुरूतील डॉ. अब्दुर रहमान याचेही नाव निष्पन्न झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयसिसच्या विचारधारेच्या प्रभावाखाली आलेला डॉ. रहमान डिसेंबर २०१३ मध्ये सीरियात गेला. तिथे आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये डॉ. रहमान सामील झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध एनआयएने २० मार्च २०२० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र १२ जानेवारी २०२१ रोजी दाखल करण्यात आले होते.

या आरोपींना ७ ते २० वर्षांपर्यंत शिक्षा

न्यायालयाने आरोपी जहानजेब सामीला याला २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सादिया शेखला सात वर्षे, तसेच नबील खत्रीला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. त्याने शिक्षेचा कालावधी न्यायलयीन कैदेत पूर्ण केला आहे. बसितने आयसिसच्या दहशवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हॉइस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या खटल्यात डॉ. रहमानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अद्याप त्याला दोषी ठरवलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments