इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या हटवादीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळून आली. या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणानंतर आता वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदुताची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासारख्या प्रकरणांना आता आळा घालण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दुताची नेमणूक केली जाईल. धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत आरोग्यमार्फत असणाऱ्या रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी कुटुंबीयांकडून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. कारण पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्याने तनिषाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियाकडून केला आहे. आता या प्रकरणानंतर प्रत्येक रुग्णालयात आरोग्यदुताची नेमणूक केली जाणार आहे.