इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : समाज माध्यमावर (इन्स्टाग्राम) फॉलोअरर्स वाढविण्याच्याउद्देशातून कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांकडून गजा मारणेच्या नावाने समाज माध्यमावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशा प्रकारे ओळी लिहून त्याच्या चित्रीकरणाचा प्रसार करण्यात आला आहे. त्यांच्याविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
अक्षय निवृती शिंदे (वय १९, रा. निमगाव खालू, श्रीगोंदा), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय २०, रा. महंमदवाडी), साहिल शाहिल शेख (वय १९), इरफान हसन शेख (वय १९, दोघेही रा. सुंबा, धाराशिव) अशी ताब्यात घेण्यात आल्लेयांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रीकरणांचा समाज माध्यमांवर प्रसार केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाने ‘रिल्सस्टार’ना बोलावून घेत कारवाई करण्यात आली.
फॉलोअरर्स वाढविण्यासाठी गजा मारणेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून चित्रीकरणाच्या प्रसारातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे धमकीवजा इशारा देणारे चित्रीकरण गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, प्रशांत संदे, उपनिरीक्षक गौरव देव, सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, गणेश खरात किशोर बर्गे, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी कारवाई केली.