Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात; पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यातील कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात; पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कात्रज चौकात अपघाताची घटना समोर आली आहे. कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरचे चाक दुचाकीस्वार तरुणाच्या पोटावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी १६ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष दिलीप तिखट (रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटेनर चालक विठ्ठल बाबासाहेब गीते (वय-२६ रा. मसोबावाडी, ता. आष्टी जि. बीड) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संतोष तिखट हा त्याच्या दुचाकी घेऊन कात्रज बायपासवरुन देहूरोडच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत संतोष कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटावरुन चाक गेले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments