Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील औंधमध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती...

पुण्यातील औंधमध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे शहरातील औंधमध्ये गुरुवारी (दि.13) पहाटे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना औंध येथील पुर्वी मोबाईल शॉपी समोरील रोडवर गुरुवारी १३ जून रोजी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी श्रेयस सतीश शेट्टी (वय-30 रा. अश्विनी सोसायटी, औंध रोड, खडकी) यांनी चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार 20 ते 25 वयोगटातील आरोपींविरोधात भादंवि कलम 397, 307, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय-38 रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध), समीर रॉय चौधरी (वय-77 रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस शेट्टी हे गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सायकलवरुन ऑफिसच्या कामासाठी निघाले होते. औंधमधील पुर्वी मोबाईल शॉपी समोर 20 ते 25 वयोगटातील चार जणांनी दरोड्याच्या उद्देशाने अॅक्टीवा गाडी फिर्यादी यांच्या सायकल समोर आडवी लावली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे नसल्याचे सांगतिले. यावेळी एका आरोपीने जबरदस्ती फिर्यादी शेट्टी यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला अडवले. तेवढ्यात दुसऱ्या एका आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात रॉड मारला. मात्र, फिर्यादी यांनी तो हाताने अडवला. त्यानंतर फिर्यादी त्या ठिकाणहून पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.

त्यावेळी फिर्यादी यांनी मागे वळून पाहिले असता आरोपींनी मंगलम कन्स्ट्रक्श येथे आणखी एका व्यक्तीला मारहाण केली. तसेच रिक्षातून आलेल्या इतर आरोपींनी देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी हे रिक्षा आणि अॅक्टिवा वरुन पळून गेले. त्यानंतर फिर्यादी उपचारासाठी मेडीपॉईंट हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी समीर चौधरी यांना देखील संबंधित आरोपींनी मारहाण केल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. या आरोपींनी चौधरी यांना रॉडने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मंगलम कन्स्ट्रक्श येथे रामसोबीतकुमार मंडल यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, युनीट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments