Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्जपार्टी; ५ जण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्जपार्टी; ५ जण पोलिसांच्या ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील एफसी रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले दारू पिताना, तर बाथरूममध्ये ड्रग्सचे सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झला आहे. या व्हिडीओनंतर संबधीत विभागाचे मंत्री, हॉटेल चालक, प्रशासनातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यानंतर आता पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे..

शहरातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येत असतात. ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. दरम्यान, अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तरुण चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ड्रग्ज घेत असल्याचे दिसत आहे.

या तरुणाकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये हॉटेलचा मालक देखील आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या हॉटेलचे ३ पार्टनर देखील पोलिसांच्या ताब्यात असून संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सुषमा अंधारे, रविंद्र धंगेकर आक्रमक

दरम्यान, याप्रकरणावरुन राजकारण चांगलाच तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर हे आक्रमक झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी वेगान कारवाईला सुरु केली आहे. ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, त्या हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक संबंधित हॉटेलमध्ये दाखल झाले असून त्यामध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विकास जाधव हे देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments