इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या धक्कादायक घटनेने केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतांपाच वातावरण पसरल आहे. मात्र ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी त्वरित जाहीर का केली नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिल आहे. या प्रकरणातील आरोपी अलर्ट होऊन पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी गोपनीयता पाळली अस स्पष्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट येथील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मधमांकडून घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. याबाबत ते म्हणाले, घटना लपवली नसून तपासाची दिशा योग्य रहावी यासाठी खबरदारी घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. त्यानुसार या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी तेरा पथके तयार करण्यात आले आहेत. लवकरच या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनीं व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केला आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांनी आरोपी बाबत माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असा आव्हान देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या घटनेने विरोधकांकडून ही संताप व्यक्त केला जात असून सत्ताधारी सरकारवर आरोप केले जात आहेत.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेच्या पाच तास आधीच पोलिसांनी स्वारगेट बस स्थानकात दोन राउंड मारले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आला आहे.