Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्याच्या फौजदाराचा ड्रग्ज तस्करीत सहभागः पिंपरीतून 45 कोटींचे 45 किलो एमडी...

पुण्याच्या फौजदाराचा ड्रग्ज तस्करीत सहभागः पिंपरीतून 45 कोटींचे 45 किलो एमडी जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी- चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटींचे मेफेड्रोन सांगवी पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडले होते. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात शंकर झा (२२, मुळ बिहार) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, त्याच्याकडील चौकशीत निगडी ठाण्यात कार्यरत विकास शेळके या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.

अमली पदार्थविरोधी पथक आणि सांगवी पोलिसांनी सखोल चौकशी आणि तपास करत आणखी ४३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ४५ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत ४५ कोटी आहे.

सांगवीतील रक्षक चौक येथे एपीआय नारायण पवार यांचे पथक गस्त घालत असताना आरोपी शंकर झा याच्या ताब्यातून २ कोटी दोन लाख रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. शंकरकडे चौकशी केली असता या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव समोर आले. दरम्यान, न्यायालयाने आरोपी शंकर झा याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments