Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती; लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे...

पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती; लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे रुजू होणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती झाली आहे. भोर हे लवकरच छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी रूजू होतील. त्यांना पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गुरुवारी ६ जून रोजी पुणे येथील आपल्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

संजीव भोर यांच्याकडे असलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदांचा कार्यभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments