Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्याची ओळख "क्राइम कॅपिटल"; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत; अनिल देशमुखांची पोस्ट...

पुण्याची ओळख “क्राइम कॅपिटल”; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत; अनिल देशमुखांची पोस्ट चर्चेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निघृण खून करण्यात आला. या घटनेनंतर शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सांस्कृतिक राजधानीत अशा घटना घडत असताना सरकार गप्प का आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निष्क्रिय गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. त्यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर झाले आहे. शहरात टोळी युद्धाचा देखील भडका उडाला आहे. कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत झाले आहेत. निष्क्रिय गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत.

पुण्यात राजकीय व्यक्तींच्या हत्या

• भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची २००३ मध्ये हत्या

• शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर २०२१ मध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या

• पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी १ एप्रिल २०२३ ला प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या.

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments