Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे ISIS प्रकरणात मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांचा सोन्याच्या दुकानावर डल्ला

पुणे ISIS प्रकरणात मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांचा सोन्याच्या दुकानावर डल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करताना तिघांना पकडले होते. चौकशीत तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी एटीएसकडे आणि नंतर एनआयएकडे सोपविले होते. यानंतर आता तिन्ही दहशतवाद्यांनी सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करून रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात ही माहिती समोर आली असून याप्रकरणी एटीएसने नवीन गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिन्ही दहशतवाद्यांना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दि. 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद शहानवाज आलम शफीउजमा खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहीम (31, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ छोटु (27, रा. मध्यप्रदेश रतलाम) आणि जुल्फिकार अली बरोडावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (44, रा. भिवंडी, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चोरीच्या पैशांतून बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी

एटीएसने सांगितले की, दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील एक सोन्याचं दुकानं लुटलं. त्यांनी या दुकानातून लाखो रुपये किमतीचे दागीने आणि रोकड लंपास केली. दहशतवाद्यांनी हे सोन्याचं दुकान टेरर फंडिंगसाठी लुटल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने तिघांनाही 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments