इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : पुणे – सोलापूर राष्ट्रीयमहामार्गावर दोन ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात असलेल्या राजेंद्र पेट्रोल पंपासमोर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मालवाहू ट्रक पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चालले होते. सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जाताना, दोन्ही ट्रक माळी मळा परिसरात आले असता, एका ट्रक चालकाचे त्याच्या ताब्यातील ट्रकचे नियंत्रण सुटले. आणि त्याने समोर चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाठीमागील ट्रक जाग्यावर बंद पडला तर पुढील ट्रक घटनास्थळावरून निघून गेला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार केतन धेंडे, वाहतूक पोलिस हवालदार आनंद साळुंखे सौफिया इनामदार, नाहीद शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघ झालेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवून महामार्ग सुरळीत केला आहे.