Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे - सोलापूर महामार्गावर सोरतापवाडीत नर्सरीची रोपे घेऊन जाणारा पिकअप टेंम्पो पलटी;...

पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडीत नर्सरीची रोपे घेऊन जाणारा पिकअप टेंम्पो पलटी; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नर्सरीतील झाडे वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 05) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचनच्या बाजूने पिकअप नर्सरीतील रोपे घेऊन निघाले होते. सोरातपवाडी गावात जाणाऱ्या चौकात पिकअप पलटी झाली.

या अपघातात पिकअप व नर्सरीतील झाडांचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नसून महामार्गाच्या दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली आहे. तर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. घटना स्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments