Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज येथे दुचाकी ट्रकखाली घुसली; एकाचा मृत्यु

पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज येथे दुचाकी ट्रकखाली घुसली; एकाचा मृत्यु

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात

झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शाहुराज मारुती दुधभाते (वय-२९, रा. गुलबर्गा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात रविवारी २३ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास डाळज जवळ असणाऱ्या सीएनजी पेट्रोल पंपाजवळ घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेला ट्रक (एम एच १२ एस एक्स ३११०) डाळज जवळ आला असता ट्रकचालक सुनीलकुमार काळे (रा. धाराशिव) आणि त्याच वेळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा चालक यांच्यात कट मारल्याच्या कारणावरून बाचाबाची सुरु होती. त्याचवेळी पाठीमागून येणारी दुचाकी (एम एच २४ बीसी २५९४) ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून ट्रकच्या खाली घुसली.

या अपघातात दुचाकीस्वार शाहुराज दुधभाते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच डाळज महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन राक्षे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, विनोद मिसाळ यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments