इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच वारंवार धक्कादायक घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सातारा ते पुणे बसमध्ये एका प्रवाशांने सहप्रवासी तरुणीसमोर उघडपणे अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीनंतर नराधमाला पुण्यातील राजगड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत.
धावत्या बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाचे कमलेश प्रल्हाद शिरसाठ (रा. आंबेगाव खुर्द, पुणे मूळ रा. पी.एम. सी बँकेसमोर, बदलापूर ईस्ट, जिल्हा – ठाणे) असे नाव आहे. पोलिसांकडून आता याची चौकशी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 5 मार्च रोजी सातारा ते पुणे या बसमध्ये शिरवळ बस थांब्यावर एक अनोळखी पुरुष बसमध्ये चढला. फिर्यादी तरुणी बसमध्ये बसलेल्या सीटच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसला त्यानंतर फिर्यादीकडे बघून त्याने स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे केले. त्या तरुणास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्याच्या संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी राजगड पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार राजगड पोलीस निरीक्षक राजेश यांनी तपास पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपीस शिताफिने ताब्यात घेतले