Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 'कलेक्टरांना' मिळणार उजळणी; 'या'...

पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 ‘कलेक्टरांना’ मिळणार उजळणी; ‘या’ कोर्सनंतर कलेक्टर सुधारणार?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर पोलीस दलाच्या 29 पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांना उजळणीचे शिक्षण सुरू केले आहे. मात्र, उजळणीसाठी आलेले बहुतांश कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणारे ‘कलेक्टर’ असल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या उजळणी कोर्स नंतर वरील कलेक्टर सुधारणार की पुन्हा कलेक्शनची कामे सुरू करणार? यावर पुणे शहरातील अवैध धंद्यांचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच या 44 कलेक्टरांना त्यांचे वर्तन सुधारण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, हे सर्व कलेक्टर आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु ठेवून मोठी माया गोळा करीत होते. अवैध धंदे बंद ठेवण्याचे आदेश देऊनही ते अवैध धंद्यांना पाठबळ देत होते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्यासाठी खास उजळणी पाठ्यक्रमाबाबतचे आदेश काढले आहेत.

या आदेशात असे म्हटले आहे की, पुणे शहर विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात या 44 पोलिसांना 31 जुलै 2024 पर्यंत संलग्न करण्यात आले आहे. या पोलिसांना आज शनिवार (ता. 22) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हजर राहण्यास सांगितले होते. पोलीस उपायुक्त या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उजळणी पाठ्यक्रमाचे नियोजन करतील. तसेच सदर पाठ्यक्रमाचा दैनंदिन अहवाल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करतील, असे आदेशात म्हटले आहे.

यामध्ये लोणी काळभोर, हडपसर, फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन, शिवाजीनगर, गुन्हे शाखा, बंडगार्डन, सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, लष्कर, पर्वती, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, कोथरूड, विमानतळ, चंदननगर, लोणी कंद, येरवडा, विश्रांतवाडी, चतुश्रुंगी, वानवडी, कोंढवा, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पोलीस मुख्यालय असे २९ पोलीस ठाण्यातील 44 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अवैध धंदे बंद राहतील का?

पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असतानादेखील पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांना पाठबळ देऊन अवैध धंदे सुरु ठेवत होते. आता त्याच कलेक्टरांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आजपासून 31 जुलै पर्यंत उजळणीचे धडे सुरु केले आहेत. परंतु, कलेक्टरांनी उजळणीचे धडे गिरविल्यानंतर ते कलेक्शन थांबवून पुणे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या पोलीस कर्मचाऱ्यांची होणार उजळणी

सोमनाथ दादा बगे, जितेंद्र दत्तात्रय पवार, प्रमोद केशव मोहिते, तुळशीराव शिवाजी टेंभुर्ण, रफिक लतीफ नदाफ, महेश प्रकाश जाधव, महावीर छगन वल्टे, निलेश भाऊसाहेब पाटील, गणेश बजरंग चौबे. सतिश ज्ञानदेव कुंभार, सागर मुरलीधर केकाण, शरद लक्ष्मण गोरे, सुधीर आनंदराव गोटकुले, नवनाथ कांतीराम शिंदे, अनिस मुस्ताफ शेख, शिवदत्त विठ्ठल गायकवाड, विक्रम दादासो सावंत, अमर कांतीलाल थोरात, रमजान अलीभाई शेख, कुंदन जनार्दन शिंदे, गोविंद भारत फड, श्रीधर जनार्दन पाटील, शैलेश शिरीष चव्हाण, गणेश रोहिदास बाटे, सचिन कदम, सुशिल चंद्रकांत जाधव, सचिन सुबराव कुटे, गणेश बापू हंसगर, संदेश हनुमंत शिवले, कैलात अनंधा डुकरे, दिपक विठ्ठल चव्हाण, सागर सुभाष जाधव, तेजेस रमेश चोपडे, प्रशांत तानाजी टोणपे, अमजद गुलाब पठाण, राहुल वंजारी. शशांक खाडे, निलेश नामदेव पालवे, स्वप्निल रमेश शिवरकर, सिताराम बलमिम गायकवाड, शैलेश सुधाकर आल्हाटे, अमित बाळासाहेब साळुंखे, सतिश नामदेव सायकर, निखिल परशुराम पवार अशी उजळणीचे धडे देण्यात येणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments