Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज पुणे शहरात मोठा अपघात पहाटे चार वाहने धडकली, दोन ठार

पुणे शहरात मोठा अपघात पहाटे चार वाहने धडकली, दोन ठार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

11 नोव्हेंबर 2023 पुणे शहरात पुन्हा मोठा • अपघात झाला आहे. पुणे येथील जांभूळवाडी दरी पुलावर हा अपघात झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचवेळी चार वाहने एकमेकांना धडकली. टेम्पो पिक अप, कंटेनर, बस अशा वाहनांचा अपघात झाला. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली होती. उमेश हनुमंत वाघमारे या मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ थरकाप उडाला. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर तातडीने मदत कार्य

पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिली. पुणे जांभूळवाडी दरी पुलावर अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळतात तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्यांना जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले. सध्या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे.

पुणे शहरात 63 ठिकाणी ब्लॉक स्पॉट

2020 नंतर पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण 113 टक्के वाढले आहे. यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे ‘ब्लॅकस्पॉट’ शोधण्यासाठी समिती तयार केली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी होते. त्यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात त्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर शहर आणि जिल्ह्यांत 63 ठिकाणांनी ब्लॉक स्पॉट असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथील नवले पूल आणि पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments