Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे शहरात दोन ठिकाणी घरफोडी: 3.50 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास; विश्रामबाग...

पुणे शहरात दोन ठिकाणी घरफोडी: 3.50 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात विश्रामबाग आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोरी झाली असून चोरटयांनी रोख रक्कमेसह ३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पहिली घटना ही शनिवार पेठेत येथील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा २ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी मंजुनाथ चंद्रकांत कुरडेकर (वय ३८, रा. पिनाक कॉम्प्लेक्स, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी दुपारी साडे बारा ते सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली. कुरडेकर यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड, दागिने, मोबाइल संच असा दोन लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत.

दुसरी घटना ही वडगाव बु. येथील एका घराचा कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, घड्याळ मोबाईल असा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी विजय जग्गनाथ आपटे (वय-५७, रा. घुलेनगर, वडगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २७ ते २८ जानेवारी या दरम्यानच्या काळात घडली आहे. विजय आपटे यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूमच्या कपाटातील १० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ एअर पॉड असा ७० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयभाय करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments