Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे शहरात तीन ठिकाणी घरफोडी चोरीचे प्रकारः चोरट्यांकडून 3 लाख 22...

पुणे शहरात तीन ठिकाणी घरफोडी चोरीचे प्रकारः चोरट्यांकडून 3 लाख 22 हजारांचा मुद्देमाल लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील समर्थ, भारती विद्यापीठ आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरटयांनी रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा ३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पहिली चोरीची घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नानापेठ येथे घडली आहे. याप्रकरणी वाजीद फजल खान (वय ३४, रा. चांद तारा मस्जिद जवळ नानापेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वाजीद खान यांचा घराचा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि बेडरूम मधील १९. ६६ ग्राम सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा ५७ हजारांचा मुद्देमाल चोरल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणदिवे करत आहेत.

दुसरी घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी करण सुरेश सागडे (वय-२४, रा.आंबेगाव बुद्रुक) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी करण सागडे यांची सदनिका कुलूप लावून बंद होती. चोरटयांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा ५९ हजारांचा मुद्देमाल चोरल्याचे फिर्यादित सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खोंडे करत आहेत.

तिसरी घटना कोथरूड पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत परमहंस नगर येथे घडली आहे. याप्रकरणी राजू रामचंद्र राठोड (वय-३९, रा. परमहंसनगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजू राठोड यांची सदनिका कुलूप लावून बंद होती. चोरटयांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ४० ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा २ लाख ०६ हजारांचा मुद्देमाल चोरल्याचे फिर्यादेत सांगण्यात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments