इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरात उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमान 37.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17.1 अंश सेल्सिअस होते. आगामी दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज आहे. शहरात कोरडे वारे वाहत आहे. तसेच आकाश निरभ्र असल्यामुळे गेले काही दिवस तापमानात वाढ झाली आहे.
उकाड्याने नागरिक हैराण होवू लागले आहेत. किमान तापमानात चढउतार होत असल्यामुळे दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री गारवा असे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरेगाव पार्क येथे 37.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर सर्वात कमी किमान तापमान एनडीए येथे 16.5 अंश सेल्सिअस होते. 4 ते 9 मार्च दरम्यान, आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.