इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : येत्या 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या 27 दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार महिला सांभाळणार आहेत. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असून सह जिल्हा निबंधक तसेच दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 1 ते 27 या कार्यालयाचा तसेच विवाह नोंदणी अधिकारी पुणे जिल्हा या कार्यालयाचा कारभार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडे सोपवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यालयाच्या अधिनस्त सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 1 ते 27 या कार्यालयातील वर्ग दोन पदाचा कार्यभार महिला कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश ही नोंदणी विभागाकडून करण्यात आले आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सह जिल्हा निबंधक पुणे कार्यालयाने महिलांच्या सन्मानार्थ शुक्रवारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.