इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन तेथून संचलन सुरू झाले आहे. मात्र, जुन्या टर्मिनलमधील सर्व विमान कंपन्या नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यासाठी खूप दिवस गेले. त्याचबरोबर इमिग्रेशनची परवानगी देखील मिळत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्या टर्मिनलमधून सुरू होती. त्यामुळे नवीन टर्मिनल सुरू झाले, तरी काही उड्डाणे जुन्या टर्मिनलवरुन सुरू होती. मात्र, आता जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर जुने आणि नवीन टर्मिनल जोडले जाणार आहे. त्यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
जुने टर्मिनल बंद केल्यानंतर टर्मिनलच्या विकासाला सुरूवात केली जाणार आहे. सध्याच्या इमारतीचे आगमन क्षेत्र निर्गमन क्षेत्रामध्ये बदलण्यात येणार आहे. तसेच, पहिला मजला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदलला जाईल. नवीन निर्गमन क्षेत्रात १६ चेक-इन काऊंटर बसविण्यास येणार आहेत. तसेच, चार बॅगेज कन्व्हेयर बेल्ट काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच, इमारतीमध्ये फूड काऊंटर तयार केले जाणार आहेत. पण, त्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. काम पूर्ण झाल्यानंतर नवीन व जुनी इमारत जोडली जाणार आहे.
पुणे विमानतळावर इमिग्रेशनची परवानगी मिळत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्या टर्मिनलमधून सुरू होती. त्यामुळे नवीन टर्मिनल सुरू झाले तरी काही उड्डाणे जुन्या टर्मिनलवरुन सुरू होती. आता सर्व परवानग्या आल्या आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनल येथून झाली आहे. मात्र, जुन्या टर्मिनलमध्ये यथून सुरू विमान कंपन्यांचे काही साहित्य बाकी होते. त्यामुळे ते बंद करण्यास वेळ लागत होता. आता पुणे विमानतळ प्रशासनाने पाच मार्च पासून जुने टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेतला. आहे. त्यामुळे सर्व संचलन हे नवीन टर्मिनल येथूनच चालणार आहे.