Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, कधी सुरु होणार उड्डाणं?

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, कधी सुरु होणार उड्डाणं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले तरी ते अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. अखेर आज या नवीन टर्मिलनचे उद्घाटन करण्यात आले आसू नला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान याचवेळी देशातील अनेक टर्मिनलचं देखील उद्घाटन करणार आहेत. कोल्हापूरमध्ये देखील विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर या टर्मिनलवरून विमान उड्डाणं सुरु होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळामुळे पुण्यात उद्योगांना चालना मिळेल आणि पुणे शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या औपचारिक उद्घाटनानंतर विमान सुरक्षा आणि इतर चाचण्यां केल्या जाणार आहेत. यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो असे सांगितले जात आहे. यानंतर नियमित ऑपरेशनसाठी टर्मिनल सुरू होईल.

प्रवाशांना हाताळण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले तरी ते अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. अखेर आज या नवीन टर्मिलनचे उद्घाटन करण्यात आले आसू नला मुहूर्त मिळाला आहे. नवीन टर्मिनलमध्ये प्रति तास अंदाजे 3,000 प्रवासी आणि वार्षिक 9 दशलक्ष प्रवासी सामावून घेण्याची क्षमता आहे. या विस्तारामुळे प्रवाशांना हाताळण्याच्या विमानतळाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. ही वाढ सध्याच्या 7.20 दशलक्ष वरून दरवर्षी 12 दशलक्ष पेक्षा जास्त असेल. यात 1,000 हून अधिक वाहनांसाठी पार्किंगची जागा, 34 चेक-इन काउंटर, 15 लिफ्ट आणि 8 एस्केलेटर यांचा समावेश आहे. एकदा टर्मिनल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर एएआय विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण हाती घेण्याची योजना आखत आहे.

महाराष्ट्रीयन संस्कृती आणि वास्तुकलेची थीम

नवीन टर्मिनलला महाराष्ट्रीयन संस्कृती आणि वास्तुकली थीम वापरण्यात आली आहे. यात पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्यापासून प्रेरित दर्शनी भागाचा समावेश आहे. याशिवाय अनेक सांस्कृतिक कलाकृती आणि ऐतिहासिक पैलूंनी टर्मिनलच्या विविध विभागांना सुशोभित करण्यात आले आहे.

एकाच वेळी देशातील अनेक टर्मिनलचं उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी देशातील अनेक टर्मिनलचं उद्घाटन केले आहे. कोल्हापूरमध्ये देखील विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुणे आणि कोल्हापूरसह देशात एकाच वेळी दिल्ली, लखनऊ, आदमपूर, जबलपूर या विमानतळांवरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments