Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रोच्या गर्डरच्या कामासाठी औंध, बाणेर आणि पाषाण रस्त्यावर सोमवारी (ता. २९) आणि ३० एप्रिल रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

पाषाण रस्ता- आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक ते अभिमानश्री चौक दरम्यान रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

बाणेर रस्त्यावरून आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामध्ये प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : बाणेर रस्त्यावरून आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामध्ये येणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री चौक बाणेर रस्त्यावरून उजवीकडे वळण घेउन अभिमानश्री चौक पाषाण रस्त्याने विद्यापीठासमोरील चौकात येऊन इच्छित स्थळी जावे.

आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकामधून औंध रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी चौकातून औंध रस्त्याने जावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments