Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातील तोडफोड प्रकरणी: पोलिस उपनिरीक्षक तातडीने निलंबित

पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातील तोडफोड प्रकरणी: पोलिस उपनिरीक्षक तातडीने निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रामायण नाटकात वादग्रस्त विधाने आणि कृती केल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात शिरून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. या गंभीर घटनेची माहिती संबंधित बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्वरीत न दिल्याने त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दोषी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गाडेकर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित एक नाटक सादर केले. या नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक गोंधळ घालून बंद पाडले.

त्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शनिवारी (3) फेब्रुवारी) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी ललित कला केंद्राच्या आवराात शिरून जोरदार घोषणाबाजी करून शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या, तसेच कुंड्या फोडून नुकसान देखील केले. त्यावेळी ललित कला केंद्रात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर हे बंदोबस्तास होते.

ललित कला केंद्राच्या आवरारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड अॅक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत दिली नाही. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली. अशा प्रकारच्या बेजबाबदरपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गाडेकर यांनी तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments