Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे विद्यापीठात मराठी भाषा भवनाचे उद्घाटनः मराठी भाषेच्या इतिहासातील ही एक...

पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवनाचे उद्घाटनः मराठी भाषेच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना – प्रा. पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची निर्मिती ही मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. (डॉ) पंडित विद्यासागर यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, भाषा व साहित्य प्रशाळेचे संचालक प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, मराठी विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) तुकाराम रोंगटे यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सध्या मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून आपली मातृभाषा धोक्यात आले. त्यामुळे भाषेचे गौरव टिकवून ठेवण्याचे काम आता विद्यापीठातील मराठी भाषा भवनाला करायचे आहे, असेही प्रा. (डॉ) पंडित विद्यासागर यावेळी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र त्या दिशेने खुप उशीरा पाऊल उचलले गेले.

त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठातील या मराठी भाषा भवनावर आतापर्यंतचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी असल्याचे डॉ. सदानंद मोरे यावेळी म्हणाले.

तसेच आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राज्यभाषांना महत्त्व देण्यात आल्याने या मराठी भाषा भवनाचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यावेळी म्हणाले. तसेच यूजीसीने स्थानिक भाषांचा प्रचार होण्यासाठी आर्ट, सायन्स आणि कॉमर्स या विषयातील १५० पुस्तक मराठीत लिहण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिली आहे. सध्या महाराष्ट्र पंजाब आणि गुजरातपेक्षा समोर आहे. यादृष्टीने या भवनाला भविष्यात खुप काम करायचे असल्याचेही प्रा. (डॉ) गोसावी यांनी यावेळी सांगितले. हे भवन आजपासून विद्यार्थी-नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागातील ग्रंथालय या भवनात स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच आजपासून या दालनात मराठी भाषेसंबंधी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments