Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार ; दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या पाकिटांचा ढीग..

पुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार ; दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या पाकिटांचा ढीग..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलींच्या वस्तीगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केले जात असल्याचे समोर आले असल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, वस्तीगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीनेचं हा प्रकार उघडकीस आणला आहे. वस्तीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केले जात आहे. विद्यापीठांच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणात दारू, सिगारेट पॅकेटचे फोटो समोर आले आहे. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून तक्रारदार विद्यार्थिनीने वस्तीगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर या प्रकाराबाबत प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. याच तरुणीने मद्यप्राशन आणि धुम्रपान करणा-या वसतीगृहातील मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये, असा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतीगृहाच्या प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाहीये, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments