Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड: भाजप युवा मोर्चाच्या 12 कार्यकर्त्यांवर...

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड: भाजप युवा मोर्चाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रामायण नाटकावरून सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात धिंगाणा घालून तकाळी शाई फेकत तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा मोर्चाच्या १० ते १२ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक जगन्नाथ शंकर खरमाटे (वय ५८, रा. विठ्ठल पार्क, नवी सांगवी, पुणे) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार

प्रतीक कुंजीर (वय २९, रा. सोमवार पेठ), दयानंद शिंदे (वय २६, रा. तुळजापूर, जि. धाराशिव), निखिल राजेंद्र शिळीमकर (वय २४, रा. महर्षीनगर), शिवम मारुती बालवडकर (वय २४, रा. बालेवाडी), किरण चंद्रकांत शिंदे (वय ३३, रा. कसबा पेठ), सनी रमेश मेमाणे (वय ३२, रा. ताडीवाला रस्ता), यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित एक वादग्रस्त नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक बंद पाडले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील ललित कला केंद्राच्या आवारात गोंधळ घातला होता. आवारातील कुंड्यांची तोडफोड केली, तसेच नोटीस बोर्डाची काच देखील फोडली. नोटीस फलकावर शाईफेक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक एस गुरव पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments