Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई: रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांचे दागिने आणि...

पुणे लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई: रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रात्रीच्या वेळी एसी डब्यातील प्रवाशांचे ८ लाख ७७ हजारांचे दागिने चोरणाऱ्या एकाला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशाल विठ्ठल नागटिळक देशमुख (वय ३० रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी बलविंदर सिंह मरवा (वय ४४, रा. सुंदर कॉलनी इसानपुर, अहमदाबाद) हे कुटुंबासह चेन्नई एक्सप्रेस प्रवास करीत असताना लोणावळा ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्याण त्यांच्या पत्नीच्या पर्स मधील ८ लाख ७७ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्यात आली. याबाबत बलविंदर मरवा यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर लोहमार्ग गुन्हे शाखा आणि आरपीएफ स्टाफ पुणे यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील ५२ सीसीटिव्ही कॅमेरे तपासले आणि त्यामध्ये दोन संशयीत इसमांचे फुटेज मिळाले. त्याप्रमाणे पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलिसांनी सापळा लावला. चोरलेले दागिने विकण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या विशाल देशमुख याला अजमेर एक्सप्रेस मधील जनरल डब्यातुन ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून तपास केला असता ८ लाख ७७ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. हा फिर्यादी यांच्या पत्नीचे दागिने आणि रोख रक्कम परत करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांनी पुणे लोहमार्ग पोलीसांचे आभार मानले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, पोलीस उपनिरी स्वप्नील वाघमारे, पोलीस हवालदार अमरदिप साळुंके, इम्तीयाज अवटी जावेद शेख, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments