Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी; काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी; काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापट यांची जागा राखण्याचे आव्हान भाजपसमोर होते. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्या बरोबरच मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात होते.

पुण्यात 53.54 टक्के मतदान

• वडगाव शेरी – 51.71 टक्के

• शिवाजीनगर – 50.67 टक्के

• कोथरूड – 52.43 टक्के

• पर्वती – 55.47 टक्के

• पुणे कॅन्टोन्मेंट – 53.13 टक्के

• कसबा पेठ – 59.24 टक्के

पुणे लोकसभा मतदार संघात एकूण 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली असून यामध्ये 20,61,276 मतदारांपैकी 11,03,678 नागरिकांनी मतदान केलं आहे. त्यामध्ये 10,57,877 पुरुष मतदारांपैकी 5,84,511 म्हणजेच 55.25 टक्के एकूण पुरुषांनी मतदान केलं आहे. तर 10,03,075 महिला मतदारांपैकी 5,19,078 म्हणजेच एकूण महिलांपैकी 51.75 टक्के महिलांनी मतदान केलं आहे. इतर मतदारांपैकी (तृतीयपंथी) 324 पैकी 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments