Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे रेल्वे स्थानकामधील यार्डातः उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग; सुदैवाने जीवीतहानी टळली;...

पुणे रेल्वे स्थानकामधील यार्डातः उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग; सुदैवाने जीवीतहानी टळली; संपूर्ण डबा जळून खाक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे रेल्वे स्थानक मधील यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे डब्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. अग्निशमन दलाने संबधित आग आटोक्यात आणली मात्र, या आगीत रेल्वेचा डबा संपूर्णपणे जळाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात विविध लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविण्यात येत असतात. तसेच यार्डात गाड्या रवाना करण्यापूर्वी रेल्वे गाड्यांची कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाते. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जंक्शन यार्डात थांबलेलया रेल्वेच्या एका डब्यात अचानक भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

चार आगीचे बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी आग लागलेल्या डब्यावर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. दरम्यान, रेल्वे यार्डात थांबली असल्याने त्यात कोणी प्रवासी नव्हते. आगीत एक डबा पूर्णपण जळाला असून, दोन डब्यांना आगीची भीषण झळ पोहोचली आहे. आगीमागचे कारण स्पष्ट झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments