Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू: नेमकं काय घडलं?

पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू: नेमकं काय घडलं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात मेट्रो स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी ०१ जुलै रोजी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज कुमार (वय-४०) असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज हा स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात असताना अचानक जिन्यावर पडला. स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने मनोजलास्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. तिथे कक्षातील डॉक्टर आणि परिचारिकेने त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी मनोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांनी मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या भावाशी संपर्क साधून त्याला या घटनेची माहिती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments