Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव, प्रसंगावधान राखत शेवटच्या क्षणी उचललं...

पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव, प्रसंगावधान राखत शेवटच्या क्षणी उचललं महत्वाचं पाऊल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई, अविनाश पर्बत, प्रतिनिधी : पुणे मेट्रो स्टेशनवरील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक बाळ आणि त्याची आई दोघेही प्लॅटफॉर्मवरुन खाली पडले. ही घटना घडली तेव्हा समोर ट्रेन येत होती. परंतू प्रसंगवधामुळे दोघांचे ही प्राण वाचले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामुळे संपूर्ण घटना समोर आली.

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत 3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज दुपारी सव्वा दोन वाजता सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळताना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले.

पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके असल्याचे मेट्रो प्रशासना कडून सांगण्यात येत आहे.

मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा आणि त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांच्या बाहेर काढण्यात आले.

सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक देखील या गार्डचं कौतुक करत आहेत.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments