इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे 30 एप्रिल 2030 पर्यंत या रस्त्यावर कोणतीही टोल वाढ होणार नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यावरील रकमेत यंदा टोलवाढ झाली आहे. मात्र पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. तेथील टोलवाढीचे सूत्र एक एप्रिल 2005 रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता 30 एप्रिल 2030 पर्यंत या रस्त्यावर कोणतीही टोलवाढ होणार नाही असं एमएसआरडीसीच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे