Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या वाहनांवर नोटीस चिटकविण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवसात ही वाहने न हटवल्यास ही वाहने जप्त केली जात आहे. त्यानुसार पालिकेने आता पर्यत १३९ वाहने जप्त केली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी बेवारस वाहने आढळतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच येथे नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत असतात. त्यामुळे गेल्या वर्षीपासून महापालिकेने या बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली होती.

या कारवाईत शहरातून १२०० वाहने उचलण्यात आली होती. त्यासाठी ४० ते ५० लाख रुपयांदरम्यान खर्च आला. यापैकी काही वाहने मालकांनी शुल्क भरून सोडवून नेली. तर उर्वरित वाहनांचा लिलाव करण्यात आला. त्यातून महापालिकेला सव्वा कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर, महापालिकेतर्फे पुन्हा बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. वाहनचालकांना या मोहिमेत उचलण्यात येणारी वाहने निर्मूलन शुल्क भरून परत नेता येतील. प्रवासी बस, ट्रकसाठी २५ हजार, दहा टन वजनापर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी २० हजार, चारचाकी वाहनांसाठी १५ हजार, तीन चाकी वाहनांसाठी दहा हजार, दुचाकींसाठी पाच हजार रुपये शुल्क महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २०१७ मध्येच निर्धारित केले आहे. हे शुल्क भरून संबंधित वाहनमालक एक महिन्याच्या आत आपले वाहन सोडवून नेऊ शकतील.

वाहन उचलण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयातर्फे संबंधित वाहनावर नोटीस चिटकवण्यात येईल. त्यानंतर सात दिवसात वाहन न हटवल्यास हे वाहन जप्त केले जाईल. आतापर्यंत १३९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची माहिती 96 899 31 900 या whatsapp नंबर वर फोटो आणि लोकेशन सह पाठवावी असे आवाहन पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments