इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे त्वरित निकाली होऊन, सेवकाला लवकरात लवकर वेळेत पेन्शन सुरू व्हावी, यासाठीची प्रशासनाकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून पालिकेच्या पेन्शन विभागाच्या लेखनिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पालिकेच्या सेवापुस्तकात विविध नोंदी नसल्याने आणि विविध कारणास्तव पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहतात. पेन्शन प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणालीचे प्रशिक्षण २८ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी. श्री हॉल, पुणे मनपा मुख्य भवन) येथे आयोजित केले आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्व संबंधित पेन्शन क्लार्क, बिल क्लार्क यांनी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वा. या वेळेत प्रशिक्षण घेण्यास उपस्थित राहावे, असे आदेश पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी पेन्शन लागू करण्यासाठी एका सेवानिवृत्त कामगारांकडून पालिकेतील कामगारांकडून लाच मागण्यात आली होती.