इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या प्रकरणी त्यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाबुराव चांदेरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या घटनेप्रकरणी शंकर जाधव यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुसगाव येथे बाबुराव चांदेरे हे पोकलेनने खोदकाम करत होते. तेंव्हा, फिर्यातदार प्रशांत जाधव हे तिथे गेले आणि त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर बाबुराव चांदेरे यांनी “तू कोण विचारणारा” असं म्हणत त्यांच्या कानाखाली मारली. तसेच त्यांच्या सोबत आलेल्या इतर इतर व्यक्तीला देखील धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीची चित्रफीत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.